मौसम विभाग की चेतावणी ; मंडारा रहे हे मौसमी बादल इन राज्यो में बारिश का अलर्ट जारी. देशभरात सध्या थंडीचा कडाका वाढला असून ११ जानेवारी २०२६ च्या हवामान अंदाजानुसार उत्तर, मध्य आणि दक्षिण भारतात हवामानाचे विविध पैलू पाहायला मिळणार आहेत. उत्तर भारतात एक नवीन ‘वेस्टर्न डिस्टरबेंस’ (WD) सक्रिय होत असला तरी, त्याचा प्रभाव तूर्तास मर्यादित राहील. मात्र, १३ ते १५ जानेवारी दरम्यान डोंगराळ आणि मैदानी भागात ढगांची गर्दी वाढून काही ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते. सध्या जम्मू-काश्मीर, हिमाचल आणि पंजाबमध्ये कडाक्याची थंडी असून अमृतसरसारख्या शहरात दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा खूपच खाली (११.९ अंश सेल्सिअस) गेले आहे.
उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमध्ये दाट धुक्याचा (Fog) प्रभाव कायम आहे. राजस्थानमध्ये दक्षिणेकडून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे धुक्याचा थर आणि प्रदूषणाची पातळी वाढली असून, यामुळे सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, राजस्थान, पंजाब आणि हरियाणात दिवसाच्या तापमानात मोठी घट होऊन ‘कोल्ड डे’ (Cold Day) परिस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमध्येही ‘कोल्ड डे’चा इशारा देण्यात आला असून, ओडिशामध्ये शीतलहरीचा (Cold Wave) प्रभाव राहील.




